कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरट्यांचा सुळसुळाट

डोंबिवली दि.१२ :- कल्याण-डोंबिवलीमध्ये वाहन चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून वाहन मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच शुक्रवारी पुन्हा दोन दुचाकींसह एक` कार चोरीच्या घटनांची नोंद कल्याण-डोंबिवलीमधील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेकडे गवळीबुवा चिकणघर येथे राहणारे गुरुनाथ भोईर यांनी आपली दुचाकी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काळा तलाव रोडला साई लीला लॉन्स समोर उभी करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली.

हेही वाचा :- Kalyan ; देवगंधर्व महोत्सवाच्या पहिल्या दोन्ही पुष्पातील अदाकारीने संगीतप्रेमी तृप्त

अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेण्यास आले असता त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसरी घटना जोशी बाग परिसरात घडली. जोशी बाग परिसरात डॉक्टर चाळीत राहणाऱ्या सुनीता खैरनार या महिलेने आपल्या पतीच्या नावे असलेली कार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मातृअमी सोसायटीच्या गेटसमोर उभी केली.

हेही वाचा :- सोमवारी २७ गावांचा केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा

१६ तारखेला कार घेण्यास गेल्या असता त्यांना गाडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिसरी घटना गोविंद वाडी परिसरात घडली आहे. गोविंदवाडी मास्टर चाळीत राहणारे जिशान सैययद यांनी आपली दुचाकी ९ डिसेंम्बर रोजी रात्रीच्या ११ वाजण्याच्या सुमारास घरासमोर उभी केली. अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published.