कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले मोकाट

कल्याण दि.१५ – २०१४ मधील सर्व्हेनुसार केडीएमसीच्या हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. फेरीवाल्यांची संख्या दिवसाला वाढतच आहे. त्यातच सर्व्हेत आढळून आलेल्या फेरीवाल्यांना महापालिका ओळखपत्रे देणार आहे. याबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत होती. पण, ओळखपत्र देण्याच्या कार्यवाहीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई आहे. त्याची अंमलबजावणी करताना फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकाकडून थातूरमातूर कारवाई सुरू असताना कल्याण व डोंबिवलीतील स्कायवॉकवर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अप्रत्यक्ष मुभा देऊन प्रशासनाने न्यायालयाचा अवमान केला आहे. कल्याणमधील स्कायवॉक रेल्वेच्या पादचारी पुलाला लागून असल्याने प्रतिदिन लाखो प्रवासी त्याचा वापर करतात. स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकवर प्रारंभी फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत होते. आता हा पसारा थेट एसटी डेपोलगत असलेल्या स्कायवॉकपर्यंत पोहोचला आहे. फेरीवाल्यांसह त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणारेही काही अंशी दोषी आहेत. फेरीवाले स्कायवॉकचा अर्धा भाग व्यापत असल्याने चालायचे कसे, असा प्रश्न पादचाºयांना पडला आहे.

हेही वाचा :- डोंबिवली ; महिलांची छेड काढणाऱ्या नराधमाला महिलांची बेदम चोप ; live Video

‘तो’ कर्मचारी कोण?: डोंबिवली स्कायवॉकवरील अतिक्रमण पाहता केडीएमसीच्या ‘फ’ प्रभागातील पथकातील कर्मचाºयांच्या कारवाईवरच साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, या पथकातील एक कर्मचारी स्कायवॉकवर व्यवसाय करण्यासाठी हप्ते वसूल करत असल्याचे काही फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. हप्ते न दिल्यास बळजबरीने शर्टाच्या तसेच पॅण्टच्या खिशात हात घालून पैसे हिसकावत असल्याचेही त्यांनी सांगितले. कारवाईमुळे रोजीरोटीवर गदा येत असल्याने नाइलाजास्तव त्या कर्मचाºयाचा त्रास सहन करावा लागतो, याकडेही त्यांच्याकडून लक्ष वेधण्यात आले. दरम्यान, स्कायवॉकवर ठाण मांडणारा आणि हप्ते गोळा करणारा ‘तो’ कर्मचारी कोण, ‘त्या’ कर्मचाºयावर प्रशासन कारवाई करणार का? स्कायवॉक हे अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनले आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

‘फ’ प्रभागातील पथकाचे दुर्लक्ष

कल्याणमधील स्थिती आता हळूहळू डोंबिवलीतही निर्माण होऊ लागली आहे. प्रारंभी रात्री उशिरा या स्कायवॉकवर ‘बाजार’ मांडला जायचा, पण आता दिवसाढवळ्याही याठिकाणी अतिक्रमण होऊ लागले आहे. च्‘फ’ प्रभागाच्या अखत्यारित येणाºया या स्कायवॉककडे प्रभागातील पथकाचे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे. बुधवारी सायंकाळी पथकातील एक कर्मचारी स्कायवॉकवर असतानाही फे रीवाले बिनदिक्कत व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसत होते. च्अधूनमधून ‘ग’ प्रभागातील पथकातील कर्मचाºयांकडून याठिकाणी कारवाई सुरू होती, पण ‘फ’ प्रभागाच्या पथकातील कर्मचाºयांनी त्यांना कारवाई करण्यास मज्जाव केल्याची सूत्रांची माहिती आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email