कल्याण डोंबिवलीत घरफोड्या
डोंबिवली दि.२८ – डोंबिवली पूर्वेकडील दत्त नगर नागेश्वर कृपा अपार्टमेंट मध्ये राहणारे राजेष गावडे हे काल सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घराल कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सायंकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अद्नाय्त चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवली ; दुचाकी चोरट्याचे थैमान
दुसरी घटना कल्याण पूर्व तिसगाव परिसारत उघडकीस आली आहे. तिसगाव परिसरातील मनोहर म्हात्रे इमरती मध्ये राहणारे सुरज चव्हाण हे १५ डिसेंबर रोजी राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते.घराला कुलूप असल्याची संधी साधत रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्याच्या घराचे कुलूप तोडून घरातील रोकड सोन्याचे दागिने असा मिळून एकूण ५१ हजरांचा मुदेमाल लंपास केला. या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.