कल्याण-डोंबिवलीच्या पुलकोंडीत पडणार भर
(श्रीराम कांदू)
कल्याण दि.२७ :- दहा वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये एमएमआरडीए आणि केडीएमसीने 63 कोटी रुपये खर्चून तयार केलेलला स्कायवॉकचा काही भाग धोकादायक झाला असल्याची धक्कादायक माहिती मुंबई आयआयटीने केडीएमसीला दिली आहे.
हेही वाचा :- Kalyan ; मद्यधूंद अवस्थेत रुग्णवाहिकेच्या चालकाला वेळेतच पकडल्याने दुर्घटना टळली
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एमएमआरडीए आणि केडीएमसीने कोट्यावधी रुपये खर्चून स्कायवॉकची निर्मिती केली आहे. मात्र दहा वर्षातच या स्कायवॉकचे जिने आणि पुला खालचा भाग धोकादायक झाल्याचा धक्कादायक अहवाल मुंबई आयआयटीने केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
हेही वाचा :- मराठी भाषा दिनानिमित्त कल्याणमध्ये ग्रंथदिंडी
चार स्टेअरकेस (जिने) आणि पुलाचा खालचा काही भाग धोकादायक झाला आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने दुरुस्तीचे काम केडीएमसीकडून लवकरच हाती घेण्यात असल्याची माहिती सिटी इंजिनियर सपना कोळी यांनी दिली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांची पूल कोंडीनंतर आता स्कायवॉक कोंडी होणार असे दिसते.