Kalyan ; भाजपाच्या उपमहापौर उपेक्षा भोईर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता…?

Hits: 2

कल्याण दि.२० :- राज्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपाच्या उपमहापौर उपेक्षा भोईर हे आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. महापालिकेवर सध्या शिवसेनेच्या विनिता राणे हे महापौर आहेत तर उपेक्षा भोईर हे उपमहापौर आहेत.

हेही वाचा :- Dombivali ; पूर्ववैमनस्यातून बहीण-भावावर हल्ला

सेनेच्या महापौर विनिता राणे अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा उपमहापौर उपेक्षा भोईर यांचा खळबळजनक आरोप केला आहे. या भ्रष्ट शिवसेनासोबत राहायला आम्हाला लाज वाटतेय अस म्हणत उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.