Kalyan ; खुन्नशीतून चाकू हल्ला

Hits: 0

डोंबिवली दि.०९ :- कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात असलेल्या नारायण बंगाली इमारतीमध्ये राहणारा आशिष दास हा रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथिल पुना लिंक रोडला असलेल्या विनायक कॉलनी गेटजवळील पान टपरीवर आपला मित्र सोहेल खान याच्यासोबत पान खाण्यासाठी थांबला होता. यावेळी त्या ठिकाणी सय्यद व रव्या आपल्या दोन साथीदारांसह उभे होते.

हेही वाचा :- डोंबिवलीच्या बत्तीगुलचा प्रश्न सुटणार ?

रव्या याने आशिष याला माझ्याकडे का बघतोस ? असे विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर आशिष याला मारहाण केली. याच दरम्यान सय्यद व त्याच्या दोन साथीदारांनीही लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. तसेच रव्याने त्याच्याजवळील चाकूने आशिष याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आशिष याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात फरार हल्लेखोर सय्यद आणि रव्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.