कल्याण- अहमदनगर महामार्गावर अद्न्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यु
जुन्नर दि.०४ :- कल्याण- अहमदनगर महामार्गावर अद्न्यात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला असून काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिंपरी पेंढार गावाजवळ वालूजवाडी (मुक्ताई मंदिराजवळ ) हा आपघात झाला असून रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात रस्त्यावर आलेल्या बिबट्याला धडक दिली.
हेही वाचा :- नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल पाठवा – कृषी राज्यमंत्री सदाभाउ खोत
ही धडक इतकी भीषण होती की बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. गेली अनेक दिवसपासून जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्तसंचार वाढला आहे. मागील काही दिवसांत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची ही दुसरी घटना आहे.