कल्याण ; दुकानातून सुमारे सोळा लाखांचे लेपटोप लंपास
डोंबिवली दि.११ – कल्याण पश्चिमेकडील वल्ली पीर रोड येथे अपल एथोराईज रिसेलर चे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून कर्मचारी घरी निघून गेले. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने संधी साधत दुकानाचे शटर उचकटून दुकानात घुसून दुकानातील १५ लाख ८८ हजार ८०० रुपयाचे लेपटोप चोरून नेले. सकाळी हि बाब निदर्शनस आल्याने या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेहि वाचा :- नांदिवलीत १० हेक्टरमध्ये अद्ययावत वाहन चालक चाचणी पथ, संगणकीय वाहन तपासणी केंद्रे उभारणार
Please follow and like us: