कल्याण ; घरासमोर घाण पाणी टाकल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेस लाकडी दांडक्याने मारहाण
कल्याण दि.२२ – कल्याण पूर्व नांदिवली येथे जिजाऊ वसाहत येथे राहणारे सुरेखा पाटील याच्या चाळीमध्ये उषा पाटील राहतात. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उषा पाटील गिने घरासमोरील जागा पाण्याने धुतली हि घाण पाणी सुरेखा याच्या घरासमोर आल्याने त्यांनी उषा पाटील यांना माझ्या घरासमोरील पाणी नीट साफ कर असे सांगितले.
हेही वाचा :- लग्न झाले असतानाही तरुणीची फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा – डोंबिवलीतील घटना
त्यामुळे संतापलेल्या उषा पाटील व त्याच्या मुलीने लाकडी दांडक्याने सुरेखा यांना मारहाण करत शिवीगाळ केली. या प्रकरणी सुरेखा यांनी कोलशेवादी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी उषा पाटील व तिच्या मुली विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- तपासाच्या बहाण्याने पीडित तरुणीवर पोलीस उपनिरीक्षकाचा बलात्कार