कल्याण ; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला
कल्याण दि.२० – कल्याण पश्चिम संतोषी माता रोड घाग चाळीत राहणारे प्रशांत डोबले हे काल रात्री साडे आठ वाजन्याच्या सुमारास आपला मित्र केवल भाडकर याच्या सोबत गप्पा मारत उभे होते. यावेळी काही अंतरावर उभे असलेल्या लल्ला उर्फ आंनद सोनी ,विशाल छोटू यांचे आपापसात वाद सुरु होते. प्रशांत ,केवल त्या ठिकाणी सोडवण्यासाठी गेले.
हेही वाचा :- गोडावून मध्ये चोरी – डोंबिवलीमधील घटना
त्यामळे संतापलेल्या या त्रिकुटाने तू कशाला मध्ये येतोस तुझा का संबंध असे बोलून शिवीगाळ करत मारहाण केली तसच विशाल याने चाकूने प्रशांत यांचा पाठीवर व छतिवर वार करून तेथून पळून गेले. या प्रकरणी प्रशांत यांनी महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी लल्ला उर्फ आंनद सोनी ,विशाल छोटू विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. दुसरे लग्न जमवून फसवणूक करणाऱ्या लबाड दादल्या विरोधात गुन्हा दाखल.