वारंवार खंडित होणाऱया वीज समस्येपासून कळवा-मुंब्रा- दिवावासियांची होणार मुक्तता, टोरंट पॉवर कंपनीचा `भिवंडी फॉर्म्युला’ येणार कामी
( म विजय )
ठाणे, दि. 13 – उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा कोणताही ऋतू असो, कळवा आणि मुंब्रा- दिवावासियांना वारंवार खंडित होणाऱया वीज समस्येला सामोरे जावे लागते. भिवंडी शहरात राबविलेला फॉर्म्युला कळवा आणि मुंब्रा, दिवा विभागात राबवून अखंड वीज पुरवठा तेही महावितरणच्या दरानुसारच करण्याची ग्वाही टोरंट पॉवर कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पावसाला सुरूवात झाली की, कळवा आणि मुंब्रा, दिवावासियांना वारंवार वीज पुरवठा खंडित होणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. या गंभीर समस्येमुळे येथील जनतेत रोष आहे. वीजचोरी, वीजेची तूट यामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान होत असल्याने राज्य शासनाने येथील वीजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. वीज वितरण आणि वीज बिल वसुलीचे कंत्राट निविदा सूचनेद्वारे देण्याचे जाहीर केले. हे कंत्राट जास्त बोली बोलणाऱया टोरंट पॉवर या खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीस कंत्राट देण्याचा राज्य शासनाचा एकमेव हेतू होता की, वीज वितरण सेवेत सुधारणा होऊन नागरिकांना अखंडित वीज मिळावी आणि महसूलात होणारी तूट भरून निघावी.
टोरंट पॉवर या कंपनीला भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात वीज वितरण व वीज बिल वसुलीचे काम करण्याचा अनुभव आहे. टोरंट पॉवर कंपनीने 2007 साली एमएसईबीची फ्रेंचाईजी म्हणून भिवंडीत काम करण्यास सुरूवात केली. तेव्हा प्रचंड वीज चोरी आणि महसूलमध्ये कोट्यवधीची तूट येत होती. यासाठी टोरंट पॉवर कंपनीने एक मास्टर प्लॅन तयार केला आणि त्यात ते यशस्वी झाले असून भिवंडीकरांना अखंड वीज सेवा मिळत आहे.
आज मुंब्रा-कळवा-दिवा विभागात पावसात वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. भिवंडी आणि परिसरात अखंड वीजपुरवठा सुरू आहे, याचे कारण टोरंट पॉवर कंपनीने पावसाळापूर्व केलेली नियोजनबध्द कामे. विद्युत पुरवठा करणाऱया ओव्हरहेड वायर्स झाडांच्या फांद्यांना लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा फांद्या छाटण्यात आल्या आहेत. तसेच विद्युत पोल सुरक्षित ठेवणे, संयुक्त कंडक्टर प्रयत्न, ओव्हरहेड वायर्सचे जम्परिंग, अर्थिंगची योग्य देखरेख अशा अनेक तांत्रिक गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. तसेच 24 तास हेल्पलाईन सेंटरही उभारण्यात आले आहे.
12 वर्षांपूर्वी भिवंडीत एमएमईबीची वीज तूट 60 टक्क्यांवर होती. आज हे प्रमाण 15 टक्क्यांवर आले आहे. आजपर्यंत टोरंटने नेटवर्प आणि सुविधांसाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक भिवंडीत केली आहे. भिवंडी शहर एमईआरसीच्या गुणांमध्ये ड' श्रेणीमध्ये हेते ते आता
ब’ श्रेणीमध्ये आले आहे. भिवंडीत जिथे 12 तास वीज जाण्याचे प्रमाण होते तिथे आता दिवसभर वीज उपलब्ध आहे. भिवंडी हे पॉवरलूमसाठी प्रसिद्ध शहर आहे. तसेच भिवंडी ग्रामिण भागात अनेक गोडाऊन्स उभी राहिली आहेत. वीजपुरवठा खंडित होण्याच्या पूर्वीच्या प्रकारांमुळे डबघाईला आलेला पॉवरलूम व्यवसाय आता टोरंट पॉवरच्या वीज वितरण प्रणालीमुळे भरभराटीस येत आहे. आज भिवंडीकरांना रोजगार उपलब्ध होत आहे.
भिवंडीत जी पूर्वी परिस्थिती होती ती आता कळवा, मुंब्रा, दिवा विभागात आहे. खाजगीकरणानंतर अतिशय नियोनबद्धपणे अखंडी वीज देण्याची ग्वाही टोरंट कंपनीने दिली आहे.