दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा झाली

महाराष्ट्रातील देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी देशातील राजधानी दिल्लीत एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी दिल्लीच्या महाराष्ट्रा सदनातुन निगालेल्या भव्य पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे भोसले संपूर्ण वेळ उपस्थित होते. शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचा अभिमान मानला जातो.

हेही वाचा :- नवी दिल्ली येथे ‘एक आरोग्य भारत संमेलनाचे’ उद्‌घाटन

देशाची राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातील लोक सलग तिस-या वर्षी उपस्थित होते. या पदयात्रेत कल्याण जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस शिवाजी अवाड, भाजप ठाणे पालघरचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोक उपस्थित होते. रॅली भव्य करण्यासाठी महाराष्ट्रातील मुख्य बॅन्ड टीम देखील विशेष आमंत्रित केली गेली होती. स्वराज बॅन्ड पथक आणि शिव शाही बॅंड पथक यांच्या सोबत डोंबिवली येथील सुप्रसिद्ध आरंभ बॅन्ड टीम देखिल दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email