पत्रकाराची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

नगर – दैनिक भास्करचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. 

दारुणकर हे सुमारे 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते.गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते. 

आज दुपारी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खाली गोवा एक्सप्रेसखाली उडी मारत त्यांनी आत्महत्या केली. तोंडावरून रेल्वेचे चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.

याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दारूणकर यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email