जय जय महाराष्ट्र माझा’ला आता राज्य गीताचा दर्जा

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- राजा बढे यांनी लिहिलेल्या, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि शाहीर साबळे यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला आता राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे.


सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

टिळकनगर वाणिज्य महाविद्यालयाचे शुक्रवारी उदघाटन

‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताच्या शब्दांमध्येच ऊर्जा, उत्साह आहे. या गाण्यातील दोन कडवी घेऊन त्याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा विचार आम्ही केला असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.‌

येत्या २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

या गीतातील कोणती दोन कडवी घेण्यात येणार आहेत तसेच याबाबत कधी, कशी अंमलबजावणी केली जाणार आहे, त्याविषयी अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

एक कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत अमाप लोकप्रिय आहे.‌

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा,

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी,
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी,
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा,
जय जय महाराष्ट्र माझा

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा,
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी,
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी,
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Your email address will not be published.