ऑक्टोबरमधील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०२ :- राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत ४ हजार ७०० कोटी रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात आली आहे.‌ आता ऑक्टोबर २०२२ मध्ये पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

हेही वाचा :- संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नव्हती. मात्र आमच्या सरकारने पहिल्यांदच अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा :- कौशल्य विद्यापीठामुळे कुशल रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीस चालना- राज्यपाल कोश्यारी

या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. लवकर याबाबत विहित नमून्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. शासन शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असून मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत या शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली. ऑक्टोबर २०२२ मधील शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने ३ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचे शासनाकडून आश्वासित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.