दुचाकींचे चालक व मागील आसनावरील प्रवाशांनी हेलमेट्स परिधान करणे आणि हेलमेट्सचा योग्यप्रकारे वापर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे

मुंबई दि.२० – रस्त्यावरील अपघातांमध्ये बळी पडलेल्यांसाठीच्या जागतिक स्मृती दिनानिमित्त मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेने हेलमेटचा वापर वाढवण्यासाठी नवीन जनजागृती मोहीम सुरू करण्यासोबतच मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल २०१७ सादर केला. शहरांतील रस्त्यांवर व्यक्तींच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी हे दोन लक्षणीय उपक्रम हाती घेण्यात आले. मुंबईमधील ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टीसोबतच्या (बीआयजीआरएस) सहयोगाने मोहीम व अहवाल सादर करण्यात आले. या सादरीकरणासह मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेने हेलमेट परिधान करण्याची सक्त कार्यवाही सुरू केली.

हेही वाचा :- इफ्फी 2018 मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने आयोजित केलेले “महात्मा ऑन सेल्युलॉइड” हे प्रदर्शन रसिकांसाठी विशेष आकर्षण

प्रथमत: वाहतूक पोलिसांनी मुंबईतील वाढत्या दुचाकी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी #ClickForSafety या हॅशटॅगचा वापर करत सोशल मीडियाच्या सहयोगाने हेलमेट परिधान करण्यासंदर्भातील जनजागृती मोहीम ”कॉनसीक्वेन्सेस” सुरू केली. तसेच या मोहिमेच्या माध्यमातून त्यांना वाहन चालवताना हेलमेट्सचा वापर करण्याचे आणि नियमाप्रमाणे हेलमेट्सचा योग्यप्रकारे वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. बीआयजीआरएसचा अमलबजावणी भागीदार व्हायटल स्ट्रॅटेजीजने विकास, संदेशाचे परीक्षण आणि या मोहिमेच्या अमलबजावणीसाठी तंत्रज्ञान साह्य दिले.

दुसरे म्हणजे वाहतूक पोलिसांनी वार्षिक ”मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल २०१७” सादर केला. या अहवालामधून विविध भागांमध्ये झालेल्या अपघातांचे प्रमाण समोर आले. या अहवालामध्ये हिट मॅप्स, शहरातील उच्च धोकादायक ठिकाणे आणि जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने (जेएचयू) आयआयटी-बॉम्बेसोबतच्या सहयोगाने केलेल्या अवलोकन अभ्यासाचा समावेश आहे.

हेही वाचा :- maggi ; ‘मॅगी’ची आकर्षक ऑफर, रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या

ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज येथील रस्ता सुरक्षेसाठी प्रोग्राम संचालक केली लार्सेन म्हणाले, ”मुंबई पोलिस जीवन वाचवण्यासाठी माहिती, संप्रेषण व अमलबजावणीच्या महत्त्वपूर्ण घटकांना एकत्र आणतात, म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. प्रत्यक्षात कृती करण्यासाठी माहितीचा वापर करणे हे अनेक जीवन वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पोलिसांच्या अमलबजावणीच्या सहयोगाने सादर करण्यात आलेली जनजागृती मोहीम या प्रयत्नांचा पुरावा आहे. २०१७ मुंबई रस्ता सुरक्षा अहवालानुसार मुंबईतील जीवन वाचवण्यात आले आहे, पण रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजे. आम्ही मुंबई वाहतूक पोलिसांचे त्यांच्या कटिबद्धतेसाठी कौतुक करतो.”

पुढील आठवड्यांमध्ये मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईतील प्रमुख आऊट-ऑफ-होम (ओओएच) ठिकाणी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये मोहीम राबवण्यात येईल. तसेच यामध्ये ६८ बिलबोर्ड्स व डिजिटल स्क्रिन्स आणि ५० बस पॅनेल्सचा समावेश असेल. ही मोहीम दुचाकी मोटरसायकल्सचा चालवणा-या चालकांसोबतच मागे बसणा-या प्रवाशांना देखील हेलमेट्स परिधान करण्यासाठी आणि योग्यप्रकारे हेलमेटचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करते.

हेही वाचा :- डोंबिवली ; रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी कल्याणात महावॉकेथॉन

याव्यतिरिक्त व्हायटल स्ट्रॅटेजीज पूरक अशी सोशल मीडिया मोहीम #ClickForSafety सह पाठिंबा देत आहे. ही मोहीम ”कॉनसिक्वेन्सेस’ या सार्वजनिक सेवा मोहिमेला चालना देईल. ”कॉनसिक्वेन्सेस” मोहीम हेलमेट परिधान न केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांच्या तुलनेत अपघातादरम्यान हेलमेट योग्यप्रकारे परिधान केले असल्यास जीवन वाचवणाऱ्या परिणामांवर अधिक भर देते. मुंबईतील विविध वयोगट, लिंग आणि सामाजिक-आर्थिक स्थितीतील दुचाकी चालक व प्रवाशांमध्ये ”कॉनसिक्वेन्सेस” मोहिमेची पूर्व चाचणी घेण्यात आली.

व्हायटल स्ट्रॅटेजीजमधील पॉलिसी, अॅडवोकॅसी व कम्युनिकेशन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संद्रा मुलिन म्हणाले, ”मुंबईमध्ये अर्ध्याहून कमी मोटरसायकलिस्ट्स नियमानुसार हेलमेट्स परिधान करतात आणि चालकांच्या मागे बसणा-या प्रवाशांच्या संदर्भात हा आकडा आणखीच कमी होतो. आम्हाला माहीत आहे की मीडिया मोहिमांसोबतच प्रबळ अमलबजावणी प्रयत्न रस्त्यावरील वाहन चालकांच्या धोकादायक सवयींमध्ये बदल करू शकतात. माहितीचा वापर करत सक्त अमलबजावणी करण्यासाठी आणि नवीन ”क्लिक फॉर सेफ्टी” मोहिमेसारख्या शहरव्यापी मीडिया मोहिमांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबई वाहतूक पोलिसांचे कौतुक करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे लाखो लोकांचे रस्त्यांवरील मृत्यू व अपघातांपासून संरक्षण होईल.”

हेही वाचा :- पश्चिमी नौदल कमांडच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तिसऱ्या हाफ मॅरेथॉनसाठी 15 हजारांवर जणांची नोंदणी

मुंबई वाहतूक पोलिस शाखा व्हायटल स्ट्रॅटेजीजसोबतच्या सहयोगाने गेल्या वर्षापासून काम करत २०१७ मधील रस्त्यावरील अपघातांमुळे झालेल्या मृत्यूच्या माहितीचा सविस्तर व व्यापक अहवाल देखील तयार करत आहे. या अहवालामध्ये वय, लिंग, रोड युजरचा प्रकार, निष्काळजीपणे वाहन चालवण्याची सवय आणि कॅज्युअल वेईकल प्रकार अशा विभागानुसार रस्ते वाहतूक अपघातांचा समावेश आहे. हेलमेटचा वापर, वाहन चालवतानाची गती, मद्यपान करून ड्रायव्हिंग आणि सीट बेल्टचा वापर/मुलांना गाडी न वापरण्यास देणे अशा अवलोकन अभ्यासाचा देखील या अहवालामध्ये समावेश आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने आयआयटी-बॉम्बेसोबतच्या सहयोगाने या अभ्यासाचे संकलन व विश्लेषण केले आहे.

व्हायटल स्ट्रॅटेजीजसाठी सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक औषध सल्लागार डॉ. सारा व्हाइटहेड म्हणाल्या, ”मुंबई शहरातील कुटुंबांवर परिणाम करणा-या रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी मी मुंबई वाहतूक पोलिसांचे त्यांनी दाखवलेल्या कटिबद्धतेसाठी अभिनंदन करते. समुदायातील कोणाच्याही बाबतीत अशा अचानक व दुखद घटना घडू शकतात आणि अशा घटनांमध्ये तरूण पिढीचाच समावेश अधिक आहे. पण रस्त्यांवरील दुखापती व मृत्यू असे अपघात प्रतिबंधात्मक आहेत आणि असे अपघात होणे अस्वीकार्य आहे. ही व्यापक माहिती सांगण्याच्या माध्यमातून सर्व भागधारक अधिक प्रभावीपणे व कार्यक्षमपणे कृती करत उच्च धोकादायक ठिकाणे, लोक व त्यांच्या वाहन चालवण्याच्या सवयींवर लक्ष ठेवू शकतात.” त्या पुढे म्हणाल्या, ”गेल्या दोन वर्षांमध्ये मृत्यूंच्या प्रमाणामध्ये २० टक्के घट ही चांगली कामगिरी आहे. पण हा अहवाल आम्हाला या कामगिरीपर्यंतच संतुष्ट न राहण्याची आणि हे अनावश्यक अपघात व मृत्यू टाळण्यासाठी आमच्या प्रयत्नांमध्ये नाविन्यता आणण्याची आठवण करून देतो.”

मुंबईतील मोटरसायकलिस्ट्सना अपघाताचा अधिक धोका आहे. रस्त्यांवर होत असलेल्या चाळीस टक्के अपघातांमध्ये बहुतांश आरोग्यदायी तरूण पिढीचा समावेश आहे. डॉ. व्हाइटहेड म्हणाल्या, ”हेलमेटचा योग्य वापर अपघातामध्ये देखील मृत्यू होण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी करते. असे असले तरी शहरातील अर्ध्याहून कमी मोटरसायकल ड्रायव्हर्स हेलमेट्सचा योग्य प्रकारे वापर करतात.”

ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (बीआयजीआरएस) बाबत

ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (बीआयजीआरएस) हा आंतरराष्ट्रीय प्रोग्राम शहरी शासनांना त्यांचे रस्ता सुरक्षा प्रयत्नांना वाढवण्यासाठी तंत्रज्ञान साह्य देतो. ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉपिजचा पाठिंबा असलेला हा पाच वर्षांचा उपक्रम आहे. हा उपक्रम जगभरातील १० शहरे व पाच देशांमध्ये राबवण्यात आला आहे. २०१० पासून ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉपिजच्या रस्ता सुरक्षेमधील गुंतवणुकांनी यूएनच्या दशकापासूनच्या अॅक्शन ऑन रोड सेफ्टीला चालना दिली आहे.

(अ) जनजागृती मोहिमा आणि वाहतूक नियमांची अमलबजावणी यांमध्ये योग्यरित्या समन्वय साधत चालकांमध्ये सुरक्षतिपणे वाहन चालवण्याच्या सवयीला चालना देणे, (ब) वाहनांची गती कमी करण्यासोबतच पादचा-यांच्या सुरक्षिततेला अनुसरून रस्त्यांची डिझाइन/पुनर्निमाण करत सुरक्षित पायाभूत सुविधा निर्माण करणे, (क) जलदपणे बस सुविधा उपलब्ध करून देण्यासारख्या सुरक्षित व शाश्वतपूर्ण परिवहन यंत्रणा तयार करणे, अशा सोयीसुविधांच्या माध्यमातून वाहतूक-संबंधित मृत्यू व अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाचे मुख्य घटक म्हणजे सुरक्षित रस्ते/सुरक्षित प्रवास, रस्ता सुरक्षाबाबत संप्रेषण आणि मीडिया, रस्ता सुरक्षा अमलबजावणी आणि सर्व्हायलन्स.

इनिशिएटिव्ह जगातील आघाडीच्या रस्ता सुरक्षा संस्थांसोबत सहयोगाने नियमांची अमलबजावणी करते आणि देशातील शासन भागधारकांसह समन्वय साधते. ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टीमधील सहभागी १० शहरांमध्ये मुंबईचा समावेश आहे.

मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) ही या इनिशिएटिव्हसाठी नोडल एजन्सी आहे आणि मुंबई वाहतूक नियंत्रण शाखा, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन निगम (बेस्ट) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हे सहभागीदार आहेत.

मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल २०१७ची प्रमुख वैशिष्ट्ये

२०१५ मध्ये ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉपिज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी सुरू झाल्यापासून मुंबईतील रस्त्यांवरील अपघाती मृत्यू २० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

रस्त्याचा अधिक वापर पादचारी करतात, त्यानंतर मोटरसायकलिस्ट्स आणि चालकांच्या मागे बसणारे प्रवासी. २०१७ मध्ये मुंबईतील एकूण मृत्यूंमध्ये पादचाऱ्यांचे ५२ टक्के प्रमाण आहे, तर मोटरसायकलिस्ट्स व मागे बसणाऱ्या प्रवाशांचे एकूण मृत्यूंमध्ये ३८ टक्के प्रमाण आहे.

रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंमध्ये ८३ टक्के पुरुषांचा समावेश आहे आणि यामध्ये सर्वाधिक १५ ते ४४ वर्षे वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे.

इतर वाहनांच्या तुलनेत व्यावसायिक वाहने ही रस्त्यांवरील अधिक अपघातांसाठी अधिक कारणीभूत आहेत.

अपघातांचे प्रमाण सायंकाळच्या वेळी अधिक असल्याचे आढळून आले.

मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ही अपघातांसाठी उच्च धोकादायक क्षेत्रे आहेत.

मोटरसायकलिस्ट्समध्ये मृत्यूसाठी प्रमुख धोकादायक घटक म्हणजे हेलमेटचा अयोग्य वापर. मोटरसायकल राइडर्समध्ये हेलमेटच वापरण्याचे प्रमाण २०१५ मध्ये ६८ टक्क्यांवरून २०१८ मध्ये ९२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान फक्त १ टक्के मागे बसणारे प्रवासी हेलमेट परिधान करत असल्याचे आढळून आले आहे.

मार्च २०१८ पर्यंत फक्त ४६ टक्के मोटरसायकल राइडर्स योग्यपणे हेलमेट्स परिधान करत असल्याचे आढळून आले. मोटरसायकलिस्ट्स आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांमध्ये हेलमेट्स परिधान करण्याचे प्रमाण २०१५ मधील २४ टक्क्यांवरून २०१७च्या अखेरपर्यंत ३४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. वेगाने गाडी चालवणे हा मोटरसायकलिस्ट्सच्या मृत्यूंसाठी आणखी एक धोकदायक घटक आहे.

भागीदार : व्हायटल स्ट्रॅटेजीज, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), वर्ल्ड बॅक ग्लोबल रोड सेफ्टी फॅसिलिटी (जीआरएसएफ), इंटरनॅशनल असेसमेंट प्रोग्राम (आयआरएपी), नॅशनल असोसिएशन ऑफ सिटी ट्रान्स्पोर्टेशन ऑफिशिअल्स (एनएसीटीओ), ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशीप (जीआरएसपी) आणि जॉन्स हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (जूएचयू).

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email