महिलांचा आत्मसन्मान करणे आपले कर्तव्य आहे – मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे

(श्रीराम कांदु)

ठाणे दि ८ मार्च २०१९ : महिलांचा आत्मसन्मान करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महिला अबला नाही त्या सक्षम आहेत आणि म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रस्थानी असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी केले. शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना सोनवणे म्हणाले, स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता असते. मी आज घडलो त्यात माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे असे सांगत आईच्या आठवणीना उजाळा दिला. या कार्यक्रमा दरम्यान पोषण अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा :- जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कल्याण शाखेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) छायादेवी शिसोदे, महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, महिला व बाल विकास विभागाचे केंद्र स्तरावरील कार्यकारी संचालक गजराज आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ ( मनाई, प्रतिबंध, निवारण) अधिनियम २०१३ या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कायदेतज्ञ दर्शन इंगोले यांनी उपस्थित महिलांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या प्रसंगी वरील मान्यवरांनी समयोचित भाषण केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी महिला उपस्थित होत्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email