‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या ‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण सुरू ! – डॉ. नील माधव दास

(रमेश शिंदे)

झारखंड दि.२८ :- पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला. तेव्हापासून शालेय पाठ्यपुस्तकांत अकबर, टीपू सुलतान आदी मुसलमान आक्रमकांचे धडे शिकवले जाऊ लागले. ते आजपर्यंत चालूच आहे. एकूणच ‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षण क्षेत्राचे इस्लामीकरण चालू आहे. हा शिक्षण जिहादच आहे. जोपर्यंत भारत संवैधानिक दृष्टीने हिंदु राष्ट्र बनत नाही, तोपर्यंत देशाच्या शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत इस्लामीकरण सुरूच राहिल, असे स्पष्ट प्रतिपादन झारखंड येथील ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

झारखंड येथील ‘पांचजन्य’चे पत्रकार श्री. रितेश कश्यप म्हणाले की, झारखंड राज्यात राजधानी रांचीसह, दुमका, जामताडा, गढवा, पलामू, पाकूर, बोकारो आदी जिल्ह्यांत सरकारी शाळांना रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी देणे, हिंदीऐवजी उर्दूला प्राधान्य देणे, या गोष्टी सामाजिक माध्यमे तथा प्रसारमाध्यमांतून उजेडात आल्या. सरकारी आदेशाशिवाय केवळ संख्याबळाच्या आधारे मुसलमानांकडून शेकडो शाळांमध्ये गेली 10 ते 25 वर्ष हे घडवून आणले जात आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व सुरू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत.

हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी म्हणाले की, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर बहुतेक शिक्षणमंत्री हे मुसलमान किंवा मुसलमान धार्जिणे होते. त्यामुळे शिक्षणात चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकांमध्ये आक्रमक मोगलांचे उदात्तीकरण करण्यासाठी पानेच्या पाने खर्ची घालण्यात आली आहेत. न्.सी.ई.आर्.टी.च्या 5 वी च्या इंग्रजीच्या पुस्तकात ‘दी लिटल बुली’ या धड्यात ‘हरि’ नावाचा विद्यार्थ्या मुलींची छेड काढणारा, तर ‘अब्दुल’ नावाचा विद्यार्थी चांगले काम करणारा दाखवला आहे. यातून डाव्या विचारांच्या लोकांनी पद्धतशीरपणे हिंदु धर्माविषयी द्वेष पसवण्याचे काम केले आहे. बालभारतीच्या पुस्तकातही ‘अफजलखानवधा’चे चित्र नाही; पण ‘ईदगाह’ हा धडा शिकवला जात आहे. गोव्याच्या एका पाठ्यपुस्तकात बार्देश प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तीन दिवस आक्रमण करून जनतेवर अत्याचार केला, असा खोटा इतिहास शिकवला जात होता. एकूणच पालकांनी जागृत होऊन मुलांच्या अभ्यासक्रमांत नेमके काय शिकवले जाते, हे सुद्धा तपासले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.