अमित ठाकरेंच्या लग्नाला मोजक्यांनाच निमंत्रण; राज ठाकरेंनी सांगितले कारण ?
नाशिक दि.२६ – पुढील जानेवारीमध्ये अमितचे लग्न आहे. हे लग्न मोठ्या प्रमाणात करणार नाही. मोजक्याच लोकांना बोलावणार आहे. कारण, मनसे पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच इतर पक्षांचे नेतेमंडळींना निमंत्रण दिल्यास ही संख्याच ५.५ ते ६ लाखांच्या घरात जाते. यामुळे जोडप्याची ससेहोलपट नको म्हणून मोजक्यांनाच लग्नाला बोलविणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा :- अजित पवार गुरुवारी डोंबिवलीत
एकट्या मुंबईतच पुरुष गटप्रमुख ११ हजार आहेत. महिला गटप्रमुखांची संख्या वेगळीच. शिवाय ते काही एकटे येणार नाहीत. यामुळे हा आकडा किती असेल याचा दोन महिन्यांपूर्वीच सहज हिशेब मांडला. हा आकडा लाखांच्या घरात जातो. यामुळे वधू-वराला त्रास होईल, असेही त्यांनी सांगितले. र पत्रकारांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांना लग्नाचे निमंत्रण देणार का असे विचारले असता, त्यांचा लग्न या गोष्टीवर विश्वास आहे का, अशी मिश्किल टिप्पणी करत स्मितहास्य केले.