रेल्वे तिकीटांचे आरक्षण करून चढ्या दराने विक्री  करण्याच्या षडयंत्राची चौकशी करा- अजित पवार

मुंबई दि.२४ :- सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने विक्री केली जाते. या षडयंत्राची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी बिष्णोई, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ के. जे. सोमय्या संकुलाला ‘नॅक’चा ए- प्लस दर्जा

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना आतापासूनच प्रतिक्षा यादींचे फलक लागले आहेत. मुंबईच्या छत्रपती टर्मिनसवरुन १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतिक्षायादी अवघ्या दीड मिनीटातच हजारापार गेल्याची बाब समोर आली. तर १६ सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर ‘रिग्रेट’ हा संदेश येत आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराज साकारतोय

त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव असल्याचे पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. कोकणातील चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणीही या पत्रात पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.