आंतरराष्ट्रीय ज्योतिष परिषदेत पू. नीलेश सिंगबाळ यांचा ‘रविंद्रनाथ टागोर पुरस्कार’ देऊन सन्मान !

कोलकाता दि.०९  – अनेक संतांनी सांगितल्यानुसार येणार्‍या काही वर्षांत भारतासह पृथ्वीवर भीषण आपत्काळ येणार आहे. त्या वेळी नैसर्गिक आपत्ती, युद्ध आदी घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जनसंहार होण्याची शक्यता आहे. याविषयी ज्योतिषशास्त्र काय सांगते; व्यक्ती, समाज आणि भारत यांची कुंडली काय सांगते, याचा अभ्यास करून या काळात ‘ज्योतिषशास्त्रानुसार काय उपाय करायला हवेत, कोणती उपासना करणे आवश्यक आहे ?’ ते समाजाला सांगायला हवे.

हेही वाचा :- कल्याण पूर्वेत रिक्षा बंद…प्रवासी बेहाल

यासाठी येणार्‍या आपत्काळाचा अचूकपणे वेध घेऊन ज्योतिषाचार्यांनी समाजाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. ते 43 व्या ‘अ‍ॅन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स इन अ‍ॅस्ट्रॉलॉजी अ‍ॅन्ड ओरिएंटल हेरिटेज’ या आंतरराष्ट्रीय ज्योतिष परिषदेत बोलत होते. या परिषदेचे आयोजन बंगाल येथील ‘इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ओरिएंटल हेरिटेज’च्या वतीने रविंद्र भवन ऑडिटोरियम येथे करण्यात आले आहे. या वेळी कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संबुद्ध चक्रवर्ती आणि इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ ओरिएंटल हेरिटेजचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण शास्त्री यांच्या हस्ते महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे पू. नीलेश सिंगबाळ यांचा ‘रविंद्रनाथ टागोर पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

हेही वाचा :- गावठी पिस्तूलासह दोघे तरुण गजाआड महात्मा फुले पोलिसांची लक्षवेधी कारवाई

7 ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चालणार्‍या ज्योतिष परिषदेत 8 फेब्रुवारी हा दिवशी पू. नीलेश सिंगबाळ यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे ‘आध्यात्मिक शोधकार्य आणि ज्योतिष’ या विषयावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी विविध देशांचे राजदूत, उच्चायुक्त, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विविध विद्यापिठांचे कुलगुरु, उप-कुलगुरु आणि विविध क्षेत्रांतील तज्ञ अन् प्रसिद्ध ज्योतिषी उपस्थित होते. या परिषदेला तामिळनाडू येथील सुप्रसिद्ध ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’चे वाचक पू. ॐ उलगनाथन्जी यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.

हेही वाचा :- राष्ट्र कल्याण पार्टी चा जाहीर पाठिंबा…

या परिषदेत बोलतांना पू. सिंगबाळ म्हणाले की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सनातन धर्माचे विविध आचार, आहार, वेशभूषा, केशभूषा, संगीत, अक्षरयोग, तीर्थक्षेत्र, मंदिर, संत आणि साधना यांचा व्यक्ती, वस्तू, वास्तू आणि वातावरण यांवर होणार्‍या परिणामांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून, तसेच वैज्ञानिक परिभाषेतून अभ्यास केला जात आहे. या समवेत ज्योतिषशास्त्रातही विविधांगी संशोधन कार्य चालू आहे. या अंतर्गत आतापर्यंत देशभरात झालेल्या ज्योतिष अधिवेशनांमध्ये 13 हून अधिक ज्योतिषशास्त्रावरील शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत.

हेही वाचा :- उद्धव ठाकरेंच्या टीकेला ‘मनसे’ उत्तर; मुख्यमंत्रीसाहेब, आधी वांद्रेतील घुसखोरांचे मोहल्ले साफ करा

ज्या व्यक्तींना अनिष्ट शक्तींचा त्रास आहे आणि ज्यांना अनिष्ट शक्तींचा त्रास नाही, अशा 300 जणांच्या कुंडल्या, तसेच संत आणि दैवी बालक यांच्याही कुंडली संशोधनासाठी संग्रहीत केल्या आहेत. यांच्या कुंडलीतील समान योगांचा अभ्यास करून व्यक्तीला मोक्षप्राप्ती करण्यासाठी ज्योतिषशास्त्राच्या आधारे साहाय्य आणि मार्गदर्शन करता यावे, हा व्यापक उद्देश हे संशोधन करण्यामागे असून यासाठी आम्ही प्रयत्नरत आहेत. या ईश्‍वरी कार्यात ज्योतिषांनी सहभागी होऊन आपलेही योगदान द्यावे, असे आवाहनही पू. सिंगबाळ यांनी या वेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.