* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसविण्याचे निर्देश

मुंबई दि.०१ :- गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री पाहणी केली. या महामार्गावर ९ किलोमीटरचे घाट क्षेत्र असून या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास ‘आयआयटी’ मुंबईला सांगितले असून त्यांनी काम सुरू केले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शहापूर येथे गर्डरसहक्रेन कोसळून १८ कामगारांचा मृत्यू

दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या ठिकाणच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संरक्षण जाळी लावली असून हा परिसर सुरक्षित केला आहे. कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

‘मणिपूर हिंसाचाराद्वारे भारताला अस्थिर करण्याचा विदेशी शक्तींचा डाव’ ‘मणिपूरमधील हिंसेमागे कोण ?’ या विषयावर विशेष संवाद

ज्या ठिकाणी डोंगराचा भाग धोकादायक असेल तो भाग पाडून त्या ठिकाणी संरक्षक जाळी टाकून हा भाग सुरक्षित करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *