दहा हजारचे पाकीट नगररसेवकांना देण्यात आलेल्याच्या आरोपाची चौकशी करा-पालिका विरोधी पक्ष नेता

( बालकृष्ण मोरे )

सत्ताधारी असलेल्या सेना कल्याण विधानसभा संघटकाने केला होता आरोप

कल्याण / पहिल्याच पावसात कोट्यवधींच्या नालेसफाईचे पितळ उघडे पडले होते शिवाजी चौक बाजारपेठ पालिका मुख्यालयात देखील पाणी साचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला .याबाबत शिवसेना माजी सभागृह नेता व कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक अरविंद मोरे यांनी संबंधित ठेकेदाराला बिले अदा करू नये ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्यांना निलंबित करावे येत्या चार दिवसात योग्य ती कार्यवाहि न झाल्यास प्रशासना विरोधात पालिका मुख्यालयासमोर चिखल फेक आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांसह महापौर सभापती याना दिला आहे .या बरोबरच त्यांनी एका वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखातीत नगरसेवकांना दहा हजाराचे पाकीट वाटण्यात आल्याचा आरोप केला होता.

या महापालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सत्ताधारी लोकांनीच महापालिकेत चिखल फेक करण्याचा इशारा व नगरसेवकांना दहा हजाराचे पाकीट दिल्याचा गंभीर व अपेक्षाहार्य आरोप केल्याने याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्ष नेता प्रकाश भोईर यांनी केल्याने माहापलिका वर्तुळात खळबळ माजली आहे.या दिलेल्या पत्रात भोईर यांनी म्हटले आहे की सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने असे आरोप व आंदोलनाची भाषा केल्याने पालिका क्षेत्रातील नागरिकांन मध्ये महापालिका प्रशासन व महापालिकेतील विरोधी पक्ष यांच्या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.या त्यांच्या विधानाची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आणि मोरे यांनी स्वपक्षांच्या नगरसेवक व पालिका प्रशासन केलेल्या आरोपाची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या स्थरावर सखोल चौकशी लवकरात लवकर कारवी व मोरे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन तातडीने करावे अशी मागणी या पत्रात विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी केली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले व गटारी सफाई करण्याचा ठेका सुमारे साडे तीन कोटीला देण्यात आला आहे .ठेकेदारासह पालिका प्रशासनाकडून नालेसफाई चा दावा करण्यात आला असला तरी काल झालेल्या पहिल्याच पावसाने नालेसफाईचे पितळ उघडे पडले .कल्याण स्टेशन रोड परिसर रामबाग रोड ,शिवाजी चौक,बाजारपेठ ,नारायण पेठ ,ओक बाग ,आंबेडकर रोड ,सुभाष मैदान येथील कामगार वसाहत,आंबे निवास ,जरीमरी नाल्या लागून असलेला सर्वच परिसरात पाणी तुंबल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले होते .याबाबत माजी सभागृह नेता व कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक अरविंद मोरे यांनी पालिका आयुक्तांसह महापौर स्थायी समिती सभापतींना निवेदन सादर केलें असून या निवेदनात गटारावरील स्लब चुकीच्या पद्धतीने बांधल्यामुळे २५ ते ३० फुटावर स्लब चे चेम्बर गटारावर टाकण्यात आलेले आहे .सफाई कामगाराचा फावडा ३ फुटाचा असल्याने साफ सफाई व चोकअप काढणे शक्य होत नाही चोक अप काढण्यासाठी लागणारे पहार ,टिकाव ,स्लब तोडण्याचे मशीन आदि साहित्य संबधित ठेकेदारकडे किंवा पालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसते त्यामुळे पावसात गटारीचे पाणी व चिखल रस्त्यावरून वाहतो .त्यामुळे ठेकेदारावर कोट्यवधीची उधळन का असा सवाल केला आहे .तसेच सदर ठेकेदारास बिलें अदा करू नयेत ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्यांना निलंबित करावे येत्या चार दिवसात योग्य ती कार्यवाहि न झाल्यास प्रशासना विरोधात पालिका मुख्यालयासमोर चिखल फेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या इशाऱ्याने व दहा हजाराचे पाकीट दिल्याच्या
वृत्तवाहिन्या दिलेल्या मुलाखातीत केला गेल्याने आता पालिका प्रशासन काय भूमिका घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email