इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल गाड्यांची सेवा ऐन गर्दीच्या वेळेत कोलमडली आहे. अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकामध्ये या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला आहे. यामुळे अंबरनाथहून कर्जतला जाणारी लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

यामुळे अप दिशेच्या वाहतुकीलाही फटका बसणार असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची दाट शक्यता आहे. अडकलेली इंद्रायणी एक्सप्रेस पुन्हा मार्गी लावण्यासाठी एक इंजिन रवाना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email