भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 28 कोटींचा टप्पा

 

रुग्णसंख्या कमी होण्याचा कल कायम, भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 7,02,887 वर पोहचली

भारतात गेल्या 24 तासात 53,256 नव्या रुग्णांची नोंद. 88 दिवसातला निचांक

सलग 39 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

बरे होण्याचा दर वाढून 96.36% वर

दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 3.83%, सलग 14 व्या दिवशी तो 5% पेक्षा कमी

भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 28 कोटींचा मैलाचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 38,24,408 सत्रांमध्ये, एकूण 28,00,36,898 लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 30,39,996 लसी देण्यात आल्या.

यात समावेश आहे:

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला आज सुरुवात होत आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे. पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते 16 जानेवारी 2021 रोजी देशव्यापी लसीकरण अभियानाला सुरुवात झाली होती.

भारतात गेल्या 24 तासात 53,256 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 88 दिवसातली ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या आहे. भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.

सलग 14 दिवस 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. केन्द्र, राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वयाने केलेल्या प्रयत्नांचेच हे फळ आहे.

भारतात सक्रीय रुग्णसंखेतही सातत्याने घट होत आहे. देशात आज 7,02,887 सक्रीय रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 26,356 इतकी घट झाली असून सध्या देशात केवळ 2.35% सक्रीय रुग्ण आहेत.

कोविड -19 संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत असल्याने सलग 39 व्या दिवशी भारतात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 78,190 रुग्ण बरे झाले आहेत.

दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासात जवळपास, 25,000 (24,934) रुग्ण बरे झाले.

भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 2,88,44,199 तर गेल्या 24 तासात 78,190 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 96.36% झाला आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 13,88,699 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 39.24 कोटींपेक्षा अधिक (39,24,07,782) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी 3.32% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी 3.83% आहे. सलग 14 व्या दिवशी हा 5% पेक्षा कमी आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email