आपत्ती जोखीम व्यवस्थापनाबाबत इंडियन ओशन रिम असोसिएशनची उद्यापासून बैठक

नवी दिल्ली, दि.०४ – आपत्ती जोखीम व्यवस्थापनाबाबत इंडियन ओशन रिम संघटनेची बैठक 5-6 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने या बैठकीचे आयोजन केले आहे.

हेही वाचा :- सीमांचल एक्सप्रेसचे डबे घसरून झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा होईल. यामध्ये परस्पर सहमतीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कोअर गट स्थापन करण्याच्या गरजेवरही चर्चा होईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email