जेद्दामध्ये भारतीय अन्न आणि कृषी ग्राहक-विक्रेते चर्चा
तांदूळ, चहा, मसाले आणि सुका मेवा निर्माण करणारे भारतीय निर्यातदार आणि सौदी अरेबियातील मोठे आयातदार यांच्यात येत्या 11 नोव्हेंबरला सौदी अरेबियातल्या जेद्दा येथे चर्चा होणार आहे. जेद्दामध्ये आयोजित अन्न आणि कृषी ग्राहक-विक्रेते संमेलनादरम्यान ही बैठक होणार आहे.
हेही वाचा:-डोंबिवली पश्चिमेकडील दिवाळी पहाटमध्ये ६६ वर्षीय आजीचा सेल्फी….
जगभरातल्या एकूण बासमती तांदूळ उत्पादनापैकी 72 टक्के तांदूळ भारतात तयार होतो. भारत जागतिक पातळीवर चहाचे उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तसेच सर्वात मोठा चौथा चहा निर्यादार देश आहे. आखाती देशात दर्जेदार असणाऱ्या भारतीय मसाल्यांना मोठी मागणी आहे.
Please follow and like us: