आपल्या चित्रपटाची कथा काळाच्या पुढे: प्रतिमा जोशी
पणजी दि.२६ – गोव्यात पणजी येथे 49 व्या इफ्फीमधे इंडियन पॅनोरमात फिचर फिल्मच्या तीन दिग्दर्शकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘पेराम्बू’चे दिग्दर्शक राम, ‘इ मा याउ’ चे दिग्दर्शक लीजो जोस पेलीस्सरी आणि ‘आम्ही दोघी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रतिमा जोशी या पत्रकार परिषदेत सहभागी झाल्या होत्या. ‘पेराम्बू’ या राम यांनी दिग्दर्शित केलेल्या या तमिळ चित्रपटाला रसिकांची प्रशंसा लाभली. दिव्यांग मूल आणि त्याचे पालकत्व या समस्येभोवती हा चित्रपट असल्याचे राम यांनी सांगितले. भारतीय प्रेक्षक हा प्रगल्भ असून चित्रपटाचा एक कलाकृती म्हणून तो आनंद घेतो.
हेही वाचा :- शब्दभ्रमकार के. एस. गोडे यांचे सहस्त्रचंद्रदर्शन
आपल्याला आव्हान वाटणाऱ्या विषयांवर चित्रपट निर्मिती करायला अधिक भावतं असे त्यांनी या संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. प्रादेशिक, राष्ट्रीय, व्यावसायिक आणि समांतर अशी चित्रपटांची वर्गवारी न करता उत्तम चित्रपट आणि वाईट चित्रपट अशी वर्गवारी हवी असे मत पेलीस्सरी यांनी व्यक्त केले. आपल्या चित्रपटात केवळ 30 ते 40 सेकंद संगीताचा उपयोग केला आहे. मात्र, सभोवतालचा आवाज हेच संगीत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा :- ॲमेझॉन अलेक्सा स्मार्ट स्पीकर्स वर फ्लॅश ब्रिफिंग स्कीलची इफ्फी 2018 मधे सुरुवात
‘आम्ही दोघी’ हा चित्रपट म्हणजे एक युवती आणि वयानं तिच्यापेक्षा फारशी मोठी नसलेली तिची सावत्र आई यांच्यातल्या भावबंधाचा 1973 मधल्या कथेवर आधारित हा चित्रपट असला तरी त्याची कथा काळाच्या पुढेच आहे असे चित्रपटाच्या दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी सांगितले. चित्रपटातल्या योग्य भूमिकेसाठी योग्य अभिनेत्यांची निवड या संदर्भात प्रश्न विचारला असता कथानक वाचायला सुरुवात करताच त्या भूमिकेसाठी योग्य चेहरा आपल्या मनात साकारतो असे त्यांनी सांगितले.