लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी हवाई प्रदर्शन 2019 मध्ये भारतीय हवाई दल सहभागी होणार

नवी दिल्ली, दि.२३ – लांगकावी आंतरराष्ट्रीय सागरी हवाई प्रदर्शन (लिमा 2019) मलेशियातल्या लांगकावी इथे 26 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. भारतीय हवाई दल प्रथमच या सागरी हवाई प्रदर्शनात सहभागी होणार असून, स्वदेशात विकसित केलेल्या एलसीए लढाऊ विमाने यात पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी हवाई दलाच्या कलईकुंडा इथून भारतीय पथक आज रवाना झाले.

या प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे भारतीय हवाई दलाला रॉयल मलेशियन एअर फोर्स समवेत संवाद साधण्यासाठी आणि दोन्ही देशातल्या हवाई दलात अधिक घनिष्ट संबंध निर्माण करण्यासाठी संधी मिळणार आहे. मलेशियन हवाई दलासमवेत यापुढे होणाऱ्या संवादासाठी हे प्रदर्शन पाया ठरणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email