एआयआयबीने आणखी 9 प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करावी, अशी भारताची अपेक्षा

मुंबई, दि.२६ – सात प्रकल्पांसाठी 1.4 अब्ज अमेरिकी डॉलर्सपैकी सुमारे 28 टक्के कर्जाची उचल केल्यानंतर आणखी 9 प्रकल्पांमध्ये एआयआयबीने गुंतवणूक करावी, अशी भारताची अपेक्षा असल्याचे वित्त मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

एआयआयबीची तिसरी वार्षिक बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली त्या अनुषंगाने गोयल पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीसाठी 86 देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

तीन वर्षांच्या अल्पावधीच्या काळात न्यू डेव्हलपमेंट बँक, आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक आणि आता पाठोपाठ आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) अशा आंतरराष्ट्रीय बहुविध बँकांच्या तीन महत्वाच्या कार्यक्रमांचे यजमानपद भारताने भूषवले आहे.

एआयआयबीच्या प्रगतीच्या वेगाचे गोयल यांनी कौतुक केले. वर्ष 2014 मध्ये उदयाला आलेली संकल्पना 6-7 महिन्यात विकसित झाली आणि वर्ष 2015 पर्यंत बहुविध विकास बँक अस्तित्वात आली. या बँकेत 88 टक्क्यांहून अधिक वाटा असलेला दुसऱ्या क्रमांकाचा भारत मोठा भागीदार आहे. ग्रामीण पायाभूत सुविधा, ऊर्जा, पर्यावरण संरक्षण, वाहतूक, टेलिकम्युनिकेशन, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि शहर विकास व लॉजिस्टिक या क्षेत्रातील पतपुरवठ्यावर एआयआयबीने आपली भारतातली गुंतवणूक केंद्रित केली आहे. भारत सर्वाधिक निधी मिळणारा देश ठरला असून आतापर्यंत 4.2 अब्ज अमेरिकी डॉलर्स निधी मिळाला आहे, असे गोयल यांनी सांगितले.

स्पष्ट, समजणारी धोरणे, उत्तम आराखडे यामुळे देशातल्या पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ सुरु आहे.

भारतात कायद्याचे राज्य असून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे, असे वित्तमंत्र्यांनी सांगितले. “मोबिलाइजिंग फाइनान्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर” या संकल्पनेवर आधारित गव्हर्नर्सच्या चर्चासत्रात ते सहभागी झाले होते. जनतेमधली एकात्मता आणि प्रक्रिया गुंतवणुकीची वाटचाल निश्चित करतात, असे वित्तमंत्री म्हणाले.

स्वच्छता निर्देशांकाच्या क्रमवारीत गेल्या काही वर्षात मुंबईने सुधारणा केली असून गुणवत्तापूर्ण जीवनासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नात सहभाग घेतला जात असल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले.

वर्ष 2022 पर्यंत पंतप्रधानांच्या योजनेनुसार प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर छत असेल, वीज असेल, उत्तम शौचालय, स्वच्छ पेयजल, घरापर्यंत रस्ता आणि इंटरनेट जोडणी असेल, यासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

एआयआयबीच्या तिसऱ्या बैठकीसाठी महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग मुख्य विभाग आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही मुख्य संस्था आहे. भारतीय उद्योग महासंघ व्यावसायिक परिषद आयोजक आहे आणि रिसर्च ॲण्ड इन्फर्मेशन सिस्टिम फॉर डेव्हलपिंग कंट्रीज ही ज्ञान भागीदार आहे.

एआयआयबी विषयी :-

आशियातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने एआयआयबी या बहुविध विकास बँकेची स्थापना झाली आहे. बँकेचे मुख्यालय बीजिंगमध्ये असून कार्यान्वयन जानेवारी 2016 मध्ये सुरु झाले.

जगभरात बँकेचे 86 सदस्य आहेत.

अधिक माहितीसाठी :-

http://aiib-am2018.gov.in/

https://www.aiib.org/

हॅशटॅग: #AIIB2018

ट्विटर : @AIIB_Official @FinMinIndia @PIBMumbai & @PIB_India

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email