अबू धाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा 2019 मध्ये भारतीय पॅव्हेलिअनचे उद्घाटन
नवी दिल्ली, दि.२७ – संयुक्त अरब अमीरातीचे उपपंतप्रधान सैफ बिन जायद अल नाहयान यांच्या हस्ते परवा म्हणजे 24 एप्रिल 2019 ला अबूधाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे उदघाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले. यावेळी संयुक्त अरब अमिरातीचे संस्कृती आणि ज्ञान विकास मंत्री श्री. नूर बंता मोहम्मद अल काबी हे उपस्थित होते. तर भारतीय राजदूत नवदीप सुरी आणि नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.गोविंद प्रसाद शर्मा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. हा पुस्तक मेळा दिनांक 24 एप्रिल ते 30 एप्रिल 2019 पर्यंत चालणार आहे. भारताला अबुधाबी पूस्तक मेळ्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून नामांकित करण्यात आले आहे.
‘द इंडिया पॅव्हिलियन’ मध्ये महात्मा गांधींच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर विशेष प्रकाश टाकण्यात आला असून, महात्मा गांधी यांनी केलेल्या कामाची एकत्रित 100 व्हॉल्युम मालिकेद्वारे ट्रांसलाईट, बॅनर, परस्परसंवादी टच पॅनेल आणि मल्टी-मीडिया पडद्याचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे पॅव्हेलियनमध्ये येणाऱ्या अभ्यागतांचा अनुभव वाढतो. ‘महात्मा गांधींचे एकत्रित कार्य’ यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रतिनिधींद्वारे सादरीकरण करण्यात येईल.