महामारी विरोधात लढा देण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी भारत तयार

नवी दिल्ली, दि.०४ :- कोरोना महामारी विरोधात लढा देण्यासाठी आपल्या मित्र राष्ट्रांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी भारत तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा

इस्रायलला क्लोरोक्वीन पुरवण्याच्या भारताच्या निर्णयाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यनाहू यांनी केले आहे, उत्तरादाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.

हेही वाचा :- शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का?; माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या महामारीविरोधात आपण सर्वांनी एकत्रित लढा द्यायचा आहे. आपल्या मित्र राष्ट्रांसाठी, शक्य ती सर्व मदत करायला भारत तयार आहे. इस्रायल मधल्या जनतेच्या उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी आपण प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email