भारत शांतताप्रिय देश, मात्र सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढा देण्याचा निर्धार-उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.२० – भारत शांतताप्रिय देश असला तरी सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढा देण्याचा निर्धार असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. त्यांच्या निवासस्थानी आज घानाचे उपराष्ट्रपती महमुदू बाबुमिया, गिनियाचे पंतप्रधान डॉ. इब्राहिम कसोरी फोफाना आणि लेसेथाचे उप पंतप्रधान मॉनयानी मोलेलेकी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.
हेही वाचा :- ऐन सुट्टीच्या काळात क्रीडा संकुल बंद बुधवारी घरडा सर्कल येथे रस्त्यावर व्यायाम
या सर्व देशांचे भारताशी पारंपरिकरित्या दृढ असलेल्या संबंधांबद्दल सर्व नेत्यांनी आनंद व्यक्त केला. हे सर्व देश आणि भारत यांच्यात शांततापूर्ण सहजीवन, लोकशाही, कायद्याचे राज्य या आणि इतर क्षेत्रात दृढ संबंध आहेत असे या नेत्यांनी स्पष्ट केले. हे सर्व देश आणि वेगवान विकसित होणाऱ्या देशांमध्ये मजबूत आर्थिक सहकार्य असल्याचे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी यापूर्वी या तिन्ही देशांतील प्रमुख नेत्यांच्या भारत भेटींना उजाळा दिला.