देशातील आठ प्रमुख उद्योगांचा ऑगस्ट 2018 मधील निर्देशांक

नवी दिल्ली, दि.०१ – देशातल्या आठ प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या प्रगतीचा निर्देशांक खालीप्रमाणे:-

ऑगस्ट महिन्यात या सर्व उद्योगांचा एकत्रित निर्देशांक 128.1 इतका होता. तर एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यातील निर्देशांक 5.5 टक्के इतका आहे.

कोळसा- ऑगस्ट महिन्यात कोळशाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 2.4 टक्क्यांनी वाढले.

कच्चे तेल- ऑगस्ट महिन्यात कच्च्या तेलाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी घटले.

नैसर्गिक वायू- ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक वायूचे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढले.

तेल शुद्धीकरण उत्पादने- पेट्रोलियम तेल शुद्धीकरण उत्पादन ऑगस्ट महिन्यात 5.1 टक्क्यांनी वाढले.

खते- ऑगस्ट महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत खतांचे उत्पादन 5.3 टक्क्यांनी घटले आहे.

पोलाद उत्पादन- ऑगस्ट महिन्यात पोलाद उत्पादन गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत 3.9 टक्क्यांनी वाढले.

सिमेंट- ऑगस्ट महिन्यात सिमेंटच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 14.3 टक्क्यांची वाढ झाली.

वीज- ऑगस्ट महिन्यात वीजेच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.4 टक्क्यांची वाढ झाली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email