केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्षयरोग उपचार आणि तपासणी केंद्र सुरू करणार

मुंबई दि.१८ :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्षयरोग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयाच्या सीव्हीटीसी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर क्षयरोग रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये अनेक अन्य विभाग असल्याने या इमारतीमध्ये नेहमीच गर्दी असते.

एस.टी.च्या तिकीट दरातील सवलतीमुळे दैनंदिन प्रवासी संख्येत सहा लाखांनी वाढ

पाचव्या मजल्यावर जाणाऱ्या क्षयरुग्णांमुळे अन्य रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या इमारतीच्या तळमजल्यावर क्षयरोग केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षयरोग केंद्रामध्ये रुग्णांना सर्व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द

तसेच या केंद्रामध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्यामुळे या इमारतीमध्ये येणाऱ्या अन्य रुग्णांना त्यांचा त्रास होणार नाही. क्षयरोग केंद्राचे काम सुरू असून, लवकरच हे केंद्र रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.