अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर राज्य वीज कंत्राटी कामगार संघांचे उद्यापासून बेमुदत उपोषण
पुणे, दि. ५
महावितरणच्या सहा वीज कंत्राटी कामगारांना तातडीने कामावर घेण्याचे आदेश अप्पर कामगार आयुक्त- पुणे यांनी दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांतर्फे उद्यापासून (६ जून) बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
अप्पर कामगार आयुक्त कार्यालया-पुणे येथे हे उपोषण करण्यात येणार आह, अशी माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे उपसरचिटणीस राहुल बोडके यांनी दिली.
कंत्राटतदार मुजोर झाले असून प्रशासनही त्यांना सहकार्य करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हिच परिस्थिती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकिटाचे उद्या प्रकाशन
या दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकेपर्यंत उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चा आदी मार्गाने निषेध नोंदविण्यात येईल, असे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे( संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले.
—-