एसटी कामगारांचे येत्या ११ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण – प्रत्येक जिल्ह्यात ‘काम बंद’ आंदोलन
मुंबई दि.१० :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थातच एसटीतील कामगार संघटनेने येत्या ११ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीत एसटीची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ ते २०२० या कालावधीत ४ हजार ८४९ कोटी रुपयांची एकतर्फी पगारवाढ घोषित केली होती.
मुंबई विद्यापीठाच्या ‘सिनेट’साठी येत्या १० सप्टेंबरला मतदान
यातील केवळ एक हजार ८४९ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे आहे. या आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू होणार आहे.
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
महामंडळ आणि सरकारने मागणी पूर्ण केली नाही तर प्रत्येक जिल्ह्यात ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कामगार संघटनेकडून ११ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणाऱ्या बेमुदत उपोषणाची नोटीस देण्यात आली आहे.