रामकृष्ण मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन आरोग्यसेवा, आदिवासी विकास कार्य कौतुकास्पद- राज्यपाल
मुंबई दि.२२ :- रामकृष्ण मिशन सारख्या संस्थांनी नीतिमूल्यांच्या माध्यमातून युवकांचे चारित्र्य घडविण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन मुंबई शाखा स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृह झाले. त्यावेळी ते बोलत होते.
व्यापक विचारांची युवा पिढी घडविण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना साहस उपक्रम, क्रीडा प्रकार, शैक्षणिक सहली, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी, अपंग विद्यार्थ्यांशी संवाद, इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांना भेट देण्यास प्रवृत्त केले पाहिजे असेही राज्यपाल बैस म्हणाले.
मोडी लिपी प्रसार समिती आणि सावरकर स्मारकातर्फे मोडी लिपी स्पर्धा
रामकृष्ण मिशन मुंबईने खार येथील अद्ययावत रुग्णालयाच्या तसेच पालघर जिल्यातील साकवार येथे आदिवासी बांधवांसाठी ग्राम विकास व कल्याण केंद्राच्या माध्यमातून मोठे कार्य उभे केले आहे असेही राज्यपाल बैस यांनी सांगितले.
यावेळी रामकृष्ण मिशन, बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी गौतमानंद, महासचिव स्वामी सुवीरानंद, मुंबई मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद, नरेन्द्रपूर केंद्राचे प्रमुख स्वामी सर्वलोकानंद, व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश पुरी तसेच देशविदेशातील रामकृष्ण मिशन शाखांचे प्रमुख उपस्थित होते.