ठळक बातम्या

मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

मुंबई दि.०३ :- मुंबईतील नरिमन पॉइंट येथे मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले.

‘निसर्गकवी’ ना. धो‌. महानोर यांचे निधन

आधुनिक स्थापत्यशैलीनुसार काळाची गरजा आणि वास्तूकलेचा वारसा यांचा संगम साधणाऱ्या मनोरा आमदार निवासाच्या ४० मजली व २८ मजली अशा दोन भव्य इमारती उभारण्यात येणार आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी

एकूण ३६८ निवासस्थाने सदस्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली असून विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची एकाच ठिकाणी राहण्याची व्यवस्था होणार आहे. या इमारतीमधील प्रत्येक सदनिकेचे क्षेत्रफळ सुमारे एक हजार चौरस फूट असणार आहे. दोन्ही इमारतींमध्ये ८०९ वाहने एकाचवेळी उभी करता येतील असा पोडियम वाहनतळही असणार आहे.

भटक्या – विमुक्त समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *