युवा सेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते आधुनिक पद्धतीच्‍या जमिनीखालील बंदिस्‍त कचरापेटय़ांचे उद्घाटन

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या घन कचरा व्‍यवस्‍थापन विभागातर्फे ‘डी’ विभागातील मफतलाल क्‍लबजवळील पादचारी उड्डाणपुलाजवळ (Skywalk), गिरगांव चौपाटी या ठिकाणी आधुनिक पद्धतीचे जमिनीखाली बंदिस्‍त कचरापेटय़ांचे उद्घाटन शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख श्री. आदित्‍य ठाकरे यांच्‍या शुभहस्‍ते आणि मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक ०८ फेब्रुवारी, २०१९) सायंकाळी करण्‍यात आले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांनी मुंबईकरांना जे-जे आश्‍वासित करण्‍यात आलेले आहे, त्‍याच्‍या पूर्ततेचे हे पाऊल असल्‍याचे प्रतिपादन श्री. ठाकरे यांनी केले.

हेही वाचा :- उत्तरपूर्व देशाच्या सौंदर्याचे पंतप्रधानांनी केले कौतुक

यावेळी विशेष उपस्थिती उप महापौर हेमांगी वरळीकर, सार्वजनिक आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा डॉ. अर्चना भालेराव, ‘सी व डी’ प्रभाग समिती अध्‍यक्ष अतुल शहा, स्‍थानिक नगरसेविका श्रीमती अनुराधा पोद्दार, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, उप आयुक्‍त (घन कचरा व्‍यवस्‍थापन)  विश्‍वास शंकरवार, प्रमुख अभियंता (घन कचरा व्‍यवस्‍थापन) सुमन वाईकर, ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्‍त विश्‍वास मोटे तसेच ‘डी’ विभाग आणि घन कचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email