जल संवर्धनामधल्या यशस्वी पद्धतीच्या अंमलबजावणीच्या गरजेवर नितीन गडकरी यांचा भर

नवी दिल्ली, दि.०९ – जलसंसाधन, नद्या विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या ‘जल चर्चा’ या मासिकाच्या उद्‌घाटनपर अंकाचे केंद्रीय जलसंसाधन, नद्या विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत प्रकाशन केले. जलसंवर्धनाबाबत जगातल्या उत्तमोत्तम यशस्वी प्रथा आणि पद्धतीच्या अंमलबजावणीच्या गरजेवर गडकरी यांनी भर दिला. या दिशेने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांनी अनेक उपाययोजना केल्या असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. यामुळे विहीरींचे पुनर्भरण झाले असून लोकांची सामाजिक-आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदत झाल्याचे गडकरी म्हणाले. पाण्याचा पुनर्वापर आणि वेस्ट टू वेल्थ म्हणजे कचऱ्यातून संपत्तीच्या महत्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

हेही वाचा :- देश हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची योग्य दिशेने वाटचाल

महाराष्ट्रातल्या आपल्या मतदारसंघात 350 मैदानं आणि 78 बागा पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. यामधे पाणी शिंपडण्यासाठी पुनर्वापर करण्याच्या पाण्याचा उपयोग केला जात असल्यामुळे पाण्याची आपोआप बचत होणार आहे. बांधकामासाठीही पुनर्वापर केलेले पाणी उपयोगी ठरेल असे ते म्हणाले. पाण्याचा पुर्नवापर करुन ते उपयोगात आणण्यासाठी राष्ट्रीय मिशन फॉर क्लिन गंगा आणि इंडियन ऑर्टल यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचाही त्यांनी उल्लेख केला. सहकार्य, समन्वय आणि संपर्क ही त्रिसुत्री जल विभागातल्या यशासाठी महत्वाची ठरते असे सांगून हे मासिक जलसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य मंच उपलब्ध करुन देईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email