पाहिल्याच पावसात महावितरणाची पोल खोल, प्रसिद्धी पत्रक काढून महावितरणने स्वतःच दिली कबूली

( बालकृष्ण मोरे )

कल्याण पाहिल्याच पावसात महावितरणची पोलखोल झाली आहे. या बाबत काढण्यात आल्याले प्रसिद्धी पत्रकात महावितरणने म्हटले आहे की, जोरदार वारा व पावसामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी केबल तुटल्या आहेत. तर विजेमुळे ट्रान्सफॉर्मर प्रभावी होत आहेत. (ट्रिप होत आहेत.) काही ठिकाणी कंडक्टर तुटले आहेत, यामुळे वीज पुरवठा बाधित होत आहे. या पहिल्या पावसात शहापूर येथे दोन एलटी पोल पडले आहेत. तर या पाहिल्याच पावसात डोंबिवलीचे २३ हजार ग्राहक बाधित झाले होते. या बरोबरच कल्याणात नऊ एचटी पोल, एक डीपी स्ट्रक्चर, सात एलटी पोल पडले आहेत. अशी स्वताच कबुली महावितरण दिली आहे.

वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटनेने बल्यानी ग्राममवासीयांची महावितरण कार्यालयावर धडक दिली आहे.टिटवाळा परिसरात सोमवार रात्री ११ ते ३ वाजे पर्यत विद्यूत पुरावठा खंडित झाला होता तसेच मंगळवारी देखील विजेचा लपंडाव सुरू असल्याने येथील जनतेचा उद्रेक झाला असून त्या मुळे ही धडक देण्यात आली आहे.

पण यावर माहिती घेतली असता ही परिस्थिती जुन्या सामग्री मुळे ओढवली आहे असे दिसून येत आहे. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी २५ ते ४० वर्षा पूर्वीच्या विद्यूत वाहिन्या अजूनही बदलल्या गेलेल्या नाहीत.अनेक पोल हे जुने झाले असून काहींना गजल्या मुळे भोके पडलेली आहेत.तर अनेक डीपी तसेच ट्रान्सफार्मर उघडे पडलेले आहेत.या मुळे अनेक वेळा जिवंतहानी व पशुहानी झालेली आहे.तर विद्युत वाहिन्या तुटणे, पोल वाकडे होणे, पडणे डीपी खराब होणे, ट्रान्सफार्मर बिघाड होणे असे अनेक प्रकार नेहमीच घडून येतात. या बरोबर जीवित हानी ही अनेक वेळा झालेली पहावयास मिळते.विद्युत वाहिन्या तुटल्यास ती विद्यूत वाहिनी ठिगळ लावून जोडली जाते असा या बाबत अनुभव आहे.तुटलेल्या जागी नविन विद्युत वाहिन्या देखील लावल्या जात नाहीत असा एकंदर महावितरण चा अनुभव आहे.

कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात गोवेली जवळ असलेल्या बांधनेचा पाडा येथे विजेची तार अंगावर पडून दोन म्हशींचा मृत्यु काही वर्षा पूर्वी झाला होता.या पूर्वी दोन घोड्यांचा विजेचा शाँक लागून मृत्यू झाला होता.२८ जुलै १७ ला रोजी टिटवाळा पश्चिम येथील वासुन्द्री रोड येथे दर्यामहाल सोसायटी समोर अशीच सकाळी सात वाजेच्या सुमारास विजेची तयार पडली. जोरदार आवाज होऊन जाळाची ठिनग्या उडाल्या. शाळेत जाणारे अनेक विद्यार्थी व कामावर जाणारी चाकरमानी थोडक्यात बचावली . ही विद्युत तार रस्त्या पासून थोडी दूर पडल्याने कोणतीही हानी झाली नाही. नाहीतर अनेक जण या विद्युत तारेच्या लपेट्यात आले असते.

कल्याण कोळसेवाडी मध्ये ही विद्युत पुरवठा वारमवार खंडित होत असल्याने नागरिकांनी तोडफोड केली आहे. हे बघता नागरिकांन मध्ये महावितरणच्या विरोधात रोष वाढला असल्याचे दिसून येत आहे.

या पूर्वी टिटवळ्याच्या इंदिरा नगर येथील मस्जिद जवळ विद्युत वायर अंगावर पडून एक जणाचा मृत्यू झाला आहे. येथील विद्यूत तारा बाबत कोणतेही सुरक्षा नसल्याने असे अपघात येथे नेहमीच होत असतात.मागील वर्षी देखील असाच अपघात टिटवाळा येथे घडला होता त्यात बाप आणि मुलगा मृत्यूमुखी पडला होता.टिटवाळ्यातील खेकडे पकडायला गेलेल्या बाप आणि मुलाचा असाच पाण्यात विद्युत प्रवाह वाहत असल्याने मृत्यू झाला होता. येथील धोकादायक विधुत ताराचे जाळे पसरले असून या विधुत तारा कधीही पडू शकतात अशी परिस्थिती आहे. कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांच्या कडे त्यांच्या आमदार निधीतून या धोकादायक विधुत वाहिन्या बदलाव्यात किंवा भूमीतगत करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. पण अनेक वर्षे जुन्या या विद्युत वाहिन्या,पोल तसेच डीपी या कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.