सेल्फीच्या नादात तरुण शंभर फूट दरीत कोसळला

सेल्फीमुळे जीव गेल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. सेल्फीचं वेड एवढ वाढलंय की त्याच्या नादात आपला जीव धोक्यात आहे याची पर्वा देखील केली जात नाही. ऋषी साहू हा आपल्या मित्रांसोबत पचमढीच्या देनवा दर्शनासाठी आला होता. तिथे शेजारीच शंभर फूट खोल दरी आहे. सेल्फी घेण्याच्या नादात तो या दरीत कोसळला.

हेही वाचा :- परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान सहन न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

पचमढी पोलिसांनी होमगार्ड, वन विभागाच्या टीमसोबत साधारण ५ तास त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हजारो फूट खाली पडल्यानंतर ऋषीचा मृतदेह रात्रभर झाडावर लटकला होता. देनवा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. देवदर्शनाला आलेले भाविक डोंगर चढून निसर्गाची मजा घेत सेल्फीसाठी धोकादायक ठिकाणी जात असतात.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email