भगव्या दौडमध्ये खड्ड्यांचे अडथळे सत्ताधारी पक्षाच्या शाखाप्रमुखाची तक्रार दाखल
डोंबिवली दि.०९ :- कल्याण-डोंबिवलीकरांना रस्त्यातील खड्डे पाचविला पुजले आहेत. जिकडे पहावे तिकडे खड्ड्यांचे स्तोम माजले असताना या खड्ड्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र येत्या रविवारी होणाऱ्या भगव्या दौडमध्ये खड्ड्यांचे अडथळे काढून टाकावेत, याकडे शिवसेना या सत्ताधारी पक्षाचे शाखाप्रमुख अजय घरत या तरूणाने एका पत्राद्वारे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात केडीएमसीच्या बांधकाम विभागीय कार्यकारी अभियंत्यांचे शाखाप्रमुख अजय घरत याने एका तातडीच्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा :- टिळकनगर शाळेच्या स्नेहसंमेलनात जागवल्या जुन्या आठवणी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता भगवी दौड मॅरेथॉनचे डोंबिवली शहर शिवसेना मध्यवर्ती शाखेमार्फत आयोजन करण्यात आले आहे. सदर दौडचा मार्ग रामचंद्र टॉकीजपासून गणेश मंदिर पथ येथून जाणार आहे. मात्र या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. स्पर्धकांना काही दुखापत होऊन नये म्हणून लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी शाखाप्रमुख घरत याने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
हेही वाचा :- वस्तूंपेक्षा मुलांची जास्त काळजी घेण्याची गरज
तर याच पार्श्वभूमीवर शाखाप्रमुख अजय घरत याने आपल्या विभागातील सुशोभित चौक या विषयावर मार्मिक टोला हाणला आहे. आपल्या विभागातील असेच काही चौक काही ठरावीक लोकांच्या नेत्यांच्या आणि सफेद कॉलरवाल्यांमुळे सुशोभित केले आहेत. उदा. अप्पा दातार चौक (भाजीवले), वीर सावरकर चौक (चावी वाले), मदन ठाकरे चौक (कपडे वाले), असे सगळेच चौक आहेत. मी आणि माझे सहकारी शिवसैनिक मित्र गेल्या १५ दिवसांपासून या प्रत्येक चौकातील भाजीवाले, कपडेवाले, यांना समजावून सांगितले आहे की, येवढी चौकाची पाटी मोकळी ठेऊन बसा.
हेही वाचा :- डोंबिवलीच्या बत्तीगुलचा प्रश्न सुटणार ?
मात्र फेरीवाल्यांना कोणी उठवू शकत नाहीत हे गेल्या १० वर्षात मी/आपण सर्व नागरिकांनी अनेकदा पालिकेची कारवाई होऊन काही उपयोग होत नाही हे पाहिले आहे. तरीही हे ऐकत नाहीत म्हणून कायद्यांतर्गत व महापालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांना लेखी तक्रार निवेदनाद्वारे ३० डिसेंबर रोजी दिली होते. शिंदे यांनी फक्त कारवाईचे आश्वासन दिले. परंतु इतके दिवस उलटूनही काही कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. नाही तर शिवसेना स्टाईलने अनोख्या पद्धतीने आंदोलन व निषेध दर्शवले जाईल, असाही इशारा शाखाप्रमुख घरत याने दिला आहे.