कल्याणच्या ग्रामीण भागात चाळमाफियांचे थैमान ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीतून गौप्यस्फोट

डोंबिवली दि.०५ – कल्याणच्या ग्रामीण पट्ट्यात चाळमाफियांनी थैमान घातले आहे. अशा चाळमाफियांवर कारवाई करण्याऐवजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने थातुरमातुर कारवाई असल्याचा गौप्यस्फोट एका ज्येष्ठ नागरिकाने केला आहे.कल्याण जवळच्या बनेली गावातील डोंगरवाली माता मंदिराजवळ संतोष पाहाडी हे ज्येष्ठ गृहस्थ राहतात. त्यांनी या भागातील इस्माईल मुगल, जुबेर मुगल आणि असीम मुगल यांच्या विरोधात कागदोपत्री लढा उभारला आहे. या तिघा चाळमाफियांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामांचा सपाटा लावला आहे. सामान्य नागरिकांना त्यापासून त्रास होत आहे. रस्त्याच्या कडेला त्यांनी 3 दुकानी गाळे बांधले.

हेही वाचा :- आत्महत्या करणाऱ्या आईला रोखण्याचा प्रयत्न केला आणि…

मात्र त्यांचे हातपाय पसरत असल्याने या पार्श्वभूमीवर 27 नोव्हेंबर रोजी या चाळमाफियांच्या विरोधात केडीएमसी आयुक्तांचे लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधले. मात्र दुसऱ्याच दिवशी 28 नोव्हेंबर रोजी एका रात्रीत चौथा गाळा बांधला. वारंवार तक्रारी करतो म्हणून संतोष पाहाडी यांना धाक-धमक्यांचे सत्र आरंभिले. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. या त्रिकुटाने पाहाडी यांना ठोसा-बुक्क्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल करण्यात आली. या घडामोडी सुरू असतानाच १ डिसेंबर रोजी १५० पोलिसांच्या ताफ्यासह मोहिली, मांडा, बनेली, टिटवाळा परिसरात केडीएमसीच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने कारवाई केली.

हेही वाचा :- चार महिन्यात डोंबिवलीत तीन खून

त्यानुसार १ डिसेंबरच्या केडीएमसीच्या मोहिमेदरम्यान या गाळ्यांवर देखिल पाडकामाची कारवाई अपेक्षित होती. मात्र मुगल त्रिकुटाने बांधलेल्या दुकानी गाळ्यांचे निष्कासन करण्याऐवजी केवळ एका गाळ्याचा जोता काढून टाकला. मात्र ३ दुकानी गाळे आहे तसेच ठेवले. यामुळे सदर चाळमाफियाचा मनोधैर्य वाढत गेला असल्याचे पाहाडी यांनी सांगितले. जवळपास १५०- २०० तरुणांना बरोबर घेऊन बांधकामे करण्याचा त्याने सपाटा लावला आहे. अशा भू तथा चाळमाफियांवर केडीएमसी आणि पोलिस खात्याने प्रतिबंधकात्मक कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक पाहाडी यांनी केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email