पुण्यात महिलेवर बसमध्ये बलात्कार, बस दोन ठिकाणी थांबून…

 

पुणे : पुण्याच्या स्वारगेट परिसरात बसमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे।

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात ट्रॅव्हल्स चालकानं स्वारगेट परिसरात एका महिलेचं अपहरण केलं आणि बसमध्येच तिच्यावर दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ शिवाजी भोंग (वय 38, रा. वडापुरी, इंदापूर) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

कामाच्या शोधात पीडित महिला तिच्या पतीसोबत वाशिमवरून पुण्यात आली होती. हे दोघेही खोलीच्या शोधात होते. पण तोपर्यंत स्वारगेट स्टँडवरच झोपू असा विचार असताना नराधमाने दोघांनाही ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितलं.

आरोपीवर विश्वास ठेवत दोघेही ट्रॅव्हल्समध्ये झोपले. अशात पती बाथरुमसाठी बाहेर गेला असता आरोपी नवनाथ याने बस सुरू केली आणि स्वारगेटमधून निघाला. महिलेने आरडा-ओरड केली पण त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपीने स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पोलिसांनी आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू आहे.

उद्धवजींची ‘अळी मिळी गुप चिळी’

Hits: 73

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email