मुंबईतील दोन लाखांहून अधिक दुकानांवर मराठी पाट्या नाहीत – बृहन्मुंबई महापालिकेची सोमवारपासून कारवाई

मुंबई- बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे पाच लाख दुकाने असून त्यापैकी दोन लाख दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात आल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. दुकानांवरील पाट्या मराठीत करण्यासाठी सोमवारपासून महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

निवडणूक चिन्हांचा रंजक प्रवास – शेखर जोशी

मराठी पाट्या नसलेल्या दुकानदारांना महापालिकेने नोटीस बजावून सात दिवसांची मुदत दिली आहे. मराठी पाट्या लावण्याच्या नियमांचे पालन केले नाही तर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.

पाणीपरवठा करणा-या तलावात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा

मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाने विशेष पथक तयार केले आहे. या पथकात ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम लांबणार

महापालिकेच्या २४ प्रभागात ही कारवाई केली जाणार आहे.‌ दुकानांवर मराठी पाटी न आढळल्यास दंड केला जाणार आहे. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शिल्लक सेनेचा रडगाणे मेळावा – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.