डोंबिवलीत शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये तुफान राडा….
डोंबिवली दि.०३ :- एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगळवारी दुपारी डोंबिवली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत शिरले. या कार्यकर्त्यांनी सोबत येताना एक ड्रिल मशीन आणले होते. शिवसेनेच्या शाखेत शिरल्यानंतर या कार्यकर्त्यांनी ड्रिल मशीनने भिंतीत भोक पाडून त्याठिकानी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले. आतापर्यंत शिवसेनेच्या या मध्यवर्ती शाखेत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो होते. मात्र, शिंदे समर्थकांनी याठिकाणी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावला. या सगळ्या प्रकारामुळे डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मार लागला आहे. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Hits: 16