नराधम ‘लव्ह जिहादीं’ना तात्काळ फासावर लटकवा !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१८ :- क्रूर आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला, सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणा-या ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करण्यात आली.

आफताब, सूफीयान या नराधमांच्या विरोधात धुळे येथे झालेल्या निषेध आंदोलनात ही मागणी करण्यात आली. आंदोलनात हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू एकता आंदोलन पक्ष, स्वदेशी जागरण मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रशेखर आझाद नगर शिवजयंती उत्सव समिती, राजेश्वर मित्र मंडळ, आद्य श्री शिवछत्रपती गोरक्ष जन आंदोलन, प्रहार अपंग क्रांती संस्था, इंदिरा महिला मंडळ धुळे, श्रीराम सेना नरव्हाळ, प्रभातनगर सांस्कृतिक मित्र मंडळ देवपूर धुळे आणि सनातन संस्था आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभागी झाल्या होत्या.

मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ ची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही १९ वर्षीय ‘निधी गुप्ता’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या नावाच्या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.