लसीकरण केंद्रे तात्काळ वाढवा – मनसे डोंबिवली

कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता डोंबिवली शहरात विविध ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्राच्या संख्येत तात्काळ वाढ करावी अश्या मागणीचे निवेदन माननीय आमदार राजु दादा पाटील यांच्या सुचनेनुसार क.डों.म.पा. आयुक्त डॅा.विजय सुर्यवंशी यांना देण्यात आले.

लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी विविध ठिकाणे सुचविण्यात आली.यावेळी शहराची लोकसंख्या लक्षात घेता सद्यस्थिती मधील लसीकरण केंद्र अपुरी पडत असल्याचे आयुक्तांना निदर्शनास आणुन दिले. आयुक्तांनी सदर मागणी मान्य करत लवकरच सदर लसीकरण केंद्र सुरु करु असे सांगितले.

सदर प्रसंगी मनसे जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर व मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत,प्रितेश म्हामुणकर उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email